पुणे, २ मार्च २०२५: स्वारगेट एसटी बसस्थानकातील धक्कादायक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असताना, पुणे महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएलच्या सुमारे ३०० बसमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध आहे. स्वारगेट घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत.
महिला सुरक्षा रक्षकांमुळे मिळणार सुरक्षित वातावरण
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनमध्ये महिला मदतनीस असतात. मात्र, पालिकेच्या शाळांमधील बसमध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता होती. ही बाब लक्षात घेऊन, प्रशासनाने महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
शिक्षण विभागासोबत चर्चा
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने शिक्षण विभागासोबत चर्चा केली आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हवीसुरक्षिततेसाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे