जनावरे चोरी मुळे पशुपालक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

भोकरदन २१ मार्च २०२४ : जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील देहेड, दानापुर, वरुड बु.गावात, रात्रीच्या वेळी चार बैल ,दोन गाई अज्ञात चोरटयानी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. जानावरे चोरी मुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

वरुड बु येथील भाऊसाहेब पूंजाराम वाघ यांच्या भोकरदन ते रेणुकाई पिंपळगाव जाणा-या रोडलगत, वरुड शिवारात शेत गट क्रमांक १२० मध्ये शेतात जनावरांचा गोठयातील अज्ञात चोरट्यांनी २ गाई चोरुन नेल्या आहेत तसेच शेख फेरोज शेख ईसा वय ३७ वर्ष व्यवसाय शेती रा. दानापुर ता. यांच्या भोकरदन ते पिंपळगाव रेणुकाई रोडवर गोठयातील दोन लाल रंगाचे बैल चोरीला गेले आहेत. तर शेनफड रामराव जाधव रा. देहेड ता. भोकरदन जि. जालना यांचे दोन लाल रंगाचे बैल चोरीला गेल्याने लाखों चे नुकसान झाल्याने पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पशुपालक शेतकऱ्यांच्या फिर्यादी वरुन भोकरदन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोकरदन पोलिस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा