पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएमपी (PMP) त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि नागरिकांची सोय करण्यासाठी आता आपल्या जागेत तीन नवे सीएनजी पंप (CNG pumps) उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात हे पंप स्वारगेट, निगडी आणि शेवाळेवाडी येथे सुरू केले जातील. यामुळे, सीएनजीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
पीएमपीच्या १,४०० सीएनजी बससोबतच आता सामान्य नागरिकांनाही या पंपांचा वापर करता येणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या या प्रयत्नांमुळे पीएमपीचे उत्पन्न वाढणार असून शहरात सीएनजी पंपांची संख्या वाढल्यामुळे वाहनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे, आता कमी वेळेत सीएनजी भरता येणार आहे. या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे











































