पुण्यामध्ये एका क्लास चालकाने विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला आणि या प्रकारानंतर प्राध्यापकाची पालकांकडून धुलाई करण्यात आली. घडलेल्या या प्रकाराविषयी पीडित मुलीने पालकांना जेव्हा सांगितले तेव्हा पालकांनी याचा जाब विचारला परंतु त्याने पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर संतप्त पालकांनी त्याची धुलाई केली. याप्रकरणी सिंहगड पोलीस चौकी मध्ये कंप्लेंट दाखल करण्यात आली आहे व पोलिसांनी त्यास अटक केली आहे.