लॉकडाऊन कालावधीत इंदापूर पंचायत समितीची दर्जेदार तयारी : दत्तात्रय भरणे

इंदापूर, दि.२६ मे २०२०: इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुट्टी असताना देखील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अधिकाधिक गुणवत्ता वाढावी व घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम परीक्षा देता याव्यात, यासाठी ऑनलाइन प्रणाली वापरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून दर्जेदार तयारी केली असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिक्षकांना ऑनलाईन बक्षिसाचे वितरण सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सोमवारी दि.२५ रोजी करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सतिश भोंग, मैनुद्दीन मोमीन, दिनेश काळे उपस्थित होते.

यावेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की, दि.८ एप्रिल ते २० एप्रिल या कालवधीमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गाच्या एकूण ३ चाचणी परिक्षा घेण्यात आल्या. या चाचणी परिक्षा मध्ये तालुक्यातील व तालुक्या बाहेरील एकूण ६६ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्याची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यासाठी इयत्ता १ ली व २ री , इयत्ता ३ री व ४ थी, इयत्ता ५ वी ते ६ वी व ७ वी ते ८ वी असे गट करण्यात आले.स्पर्धेसाठी गूगल फॉर्म तयार करण्यात आला होता.तो संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचविला.

या स्पर्धेत एकूण ९३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यांचे क्रमांक काढून विजेत्यांना प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले. तालुक्यात प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर व एलईडी टीव्ही आहे. त्यासाठी स्व:तचे व्हिडीओ असावेत, तालुक्यातील विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात अभ्यास देण्यासाठी व तालुक्यातील इंदापूर शिक्षण विभागाचा स्वत:चा व्हिडीओ स्वरूपात अभ्यासक्रम असावा. या उद्देशाने तालुक्यातील शिक्षकांची शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दिनांक ७ मे ते १७ मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.

त्यासाठी तालुक्यातील  शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ इंदापूर लर्न फ्रॉम होम हे चॅनल तयार करण्यात आले होते. या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले. या चॅनलचे अवघ्या ८ दिवसात १ हजार ५०० सबस्क्रायबर झाले आणि खूप लाईक देखील मिळत आहेत. त्याचा फायदा विद्यार्थी पालक यांना होत आहे. व्हिडिओ निर्मिती करताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून व्हिडिओ दर्जेदार व्हावा, यासाठी झूम मिटिंग या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन ५ कार्यशाळा घेण्यात आला. या कार्यशाळेस मार्गदर्शन नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक दिलीप नरसी गावीत यांनी केले. या व्हिडीओ निर्मितीचा निकाल इयत्तानिहाय जाहीर करण्यात आला असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. सुदर्शन जीन्स,लोणी देवकर या कंपनीने प्रथम क्रमांकासाठी एक हजार रूपये, द्वितीय क्रमांकासाठी ७०० रूपये व तृतीय क्रमांकासाठी ५०० रूपये अशी एकूण १४ हजार रूपयांची बक्षिसे देण्यात आली.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा