राहुल गांधी यांनी ईव्हीएम ला संबोधलं एमव्हीएम, म्हणाले ही तर मोदी वोटिंग मशीन

अररिया (बिहार), ५ नोव्हेंबर २०२०: सध्या बिहार मध्ये विधानसभा निवडणुकीच रिंगण तापलं आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अररिया मध्ये जन सभेला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार मधील सध्याच्या नितीश सरकारवर सडेतोड टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की, ईव्हीएम म्हणजे एमव्हीएम – मोदी मतदान यंत्र. पण, यावेळी बिहारमध्ये तरुणांचा रोष आहे. अशा परिस्थितीत, ईव्हीएम असो वा एमव्हीएम, यावेळी ‘युती’ जिंकत आहे. ते म्हणाले की, आपलं हे नातं एका दिवसाचं नव्हे तर आजीवनचं असावं. ते (पंतप्रधान मोदी) जितका द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात तितकं मी प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करतो. तिरस्काराला क्रोधानं नव्हे तर प्रेमानं विफल करता येतं

राहुल गांधी म्हणाले की, जर काळ्या धना विरुद्ध लढा होता तर या लढ्यामध्ये कामगार, शेतकरी, मजूर का उभे राहिले? शेतकरी, मजूर व कामगार यांच्याकडं हे काळं धन होतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच ठाऊक आहे की देशातील लाखो करोडो शेतकरी तसेच मजूर हे रोज मिळणाऱ्या मजुरीवर जगत आहे. लॉक डाउन घोषित करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेळ सुद्धा विचार केला नाही हे मजुरीवर पोट भागवणारे कामगार लॉक डाउन घोषित केल्यानंतर कुठं जातील व काय करतील?

एकत्र मिळून आम्ही राज्य बदलण्याचं काम करू: राहुल

राहुल गांधी म्हणाले की, पंजाबमध्ये फूड प्रोसेसिंगचे कारखाने आहेत, म्हणून तेथे योग्य दर उपलब्ध आहे, म्हणून मक्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला बिहारमध्ये कारखाने बसवावे लागतील. हे सर्व कारखाने आपल्या शेताजवळील असण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

मला सांगायचं आहे की, जर महायुतीचे सरकार स्थापन झाले तर प्रत्येक जाती, धर्म, गरीब, मजूर आणि प्रत्येक जिल्ह्याचे सरकार असेल. आम्ही एकत्रितपणे हे राज्य बदलण्याचे कार्य करू. छत्तीसगडमध्ये निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा आम्ही त्या निवडणुकीच्या सभेत म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास तुम्हाला २५०० रुपयांचा धान दर देण्यात येईल. आम्ही ते केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा