रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड! केंद्र सरकारकडून ७८ दिवसांचा बोनस जाहीर

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२२: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूश खबर आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचार्‍यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अनुराग ठाकूर म्हणाले, यंदाच्या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार असून, ११.२७ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना १,८३२ कोटी रुपयांचा उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. याची कमाल मर्यादा १७,९५१ रुपये असेल असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. सरकारच्या या घोषणेमुळे देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात साजरी होणार आहे.

तेल वितरण कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे अनुदान!

बोनसच्या निर्णयासह कालच्या बौठकीत तेल वितरण कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यासह मंजूरी दिली आहे. जगभरात एलपीजीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांवर आर्थिक ताण पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना २२,००० कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील नागरिकांवर पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींचा बोजा पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा