नाशिकमध्ये पावसाचा कहर; गंगापुर धरणातून तीन हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

नाशिक, १७ ऑगस्ट २०२२: गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने आज सकाळी सहा वाजल्यापासून पाणी तीन हजार क्यूसेकने गंगापुर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे नाशिक शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच नोकरवर्ग, चाकरमाने, यांची कसरत होत आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने धरणात पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने काल दुपारी तीन वाजता पाचशे क्यूसेकने व आज सकाळपासून तीन हजार क्यूसेकने गंगापुर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पावसाचा जोर असाच राहीला तर टप्प्या टप्प्यात विसर्ग वाढवण्यात येईल. अशी जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे व नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवहान केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा