RCB New Captain Rajat Patidar १४ फेब्रुवारी २०२५ : आयपीएल २०२५ चा हंगाम येत्या काही दिवसांत सुरू होणार असून त्यासाठी सर्व संघाची कसून तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या हंगामापेक्षा या हंगामात अनेक संघ बदलले असून काही संघ नव्या कर्णधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. यातच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट्स समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाची सूत्रे आता विराट कोहली नव्हे तर ‘रजत पाटीदारच्या’ हाती सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ नव्या कर्णधाऱ्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने याबबातची घोषणा केली.
कर्णधारपद म्हणून रजत पाटीदारचा विक्रम :
रजत पाटीदार हा आयपीयल मध्ये पहिल्यांदाच कर्णधार पद पार पाडणार असला तरी, त्याच्याकडे मध्यप्रदेश मध्ये नवीनतम SMAT टी-२० उपविजेत्याचा अनुभव आहे. त्याने २०१८- १९, २०१९- २० आणि अलिकडेच २०२४-२५ च्या स्थानिक हंगामात टी-२० मध्ये मध्यप्रदेशच्या संघाचे नेतृत्व केले होते. पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेश संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नवीनतम आवृत्तीत (२०२४-२५) उपविजेतेपद पटकावले होते. रजत पाटीदारने आतापर्यंत टी-२० कर्णधार म्हणून १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने १२ सामने जिंकले आहेत.


रजत पाटीदारची आयपीएलमधील कामगिरी :
रजत पाटीदारने आयपीयलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाकडून शानदर कामगिरी केली आहे. तो मधल्या फळीत संघासाठी महत्वाची भूमिका बाजवतो. २०२१ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर २०२२ च्या हंगामात त्याने आपल्या शानदार खेळीने सर्वाना प्रभावित केले होते. प्लेऑफमधील लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात त्याने नाबाद ११२ धावांची आक्रमक खेळी केली होती आणि आयपीएलच्या हंगामात प्लेऑफमध्ये शतक झाळकावणार तो पहिलाच फलंदाज ठरला होता.आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत २७ सामने खेळले असून ३४.७४ च्या सरासरीने त्याने ७९९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर १ शतक आणि ७ अर्धशतके आहेत.


आरसीबी संघाचा आठवा कर्णधार म्हणून निवड :
रजत पाटीदार हा RCB चा कार्यभार स्वीकारणारा आठवा कर्णधार ठरला आहे. याआधी संघाचे नेतृत्त्व फाफ डूप्लेसीने केले होते. परंतु यंदाच्या हंगामात फाफ डूप्ले दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व भूषविणार आहे. राहुल द्रविड , अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यानंतर आरसीबी संघाची जबाबदारी स्वीकारणार रजत पाटीदार हा चौथा भारतीय असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर