कल्याण, ३ ऑगस्ट २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यात आता सणासुदीच्या दिवसांमध्ये या कोरोनाचा असलेला मुक्काम हा सर्व आनंदावर विरजण घालतोय .
आज बहीण भावांचा दिवस, मात्र आजच्या दिवशी आपला भाऊ किंवा बहिण जर कोरोनाच्या संकटात असेल तर ? कोरोनाशी झूंजत देत असेल तर ? कारण ही सत्य परिस्थिती आहे. आपला भाऊ किंवा आपली बहिण रक्षाबंधनासाठी आपल्या घरात नसून कोविडच्या घरात आहे हे शब्दच खरेतर बोचणारे आहेत .
मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये आज बहीण भावाच्या नात्याला नव्याने अर्थ देणारी, माणूसकीचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. डोंबिवलीच्या पाटीदार भवनातील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये आज अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोविड सेंटर मधील परिचारीका , डॉक्टर आणि तेथील महिला वर्गाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला .
आपल्या परिवारापासून दूर असलेल्या भावांना आपल्या बहिणींची, आपल्या कुटूंबाची ऊणीव भासू नये म्हणून या महिला वर्गाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला .
एवढच नव्हे, तर महापालिकेच्या टाटा आमंत्रा व साई निर्वाण येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये देखील अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : राजश्री वाघमारे