गोल पोस्ट राष्ट्रीय राम मंदिर बांधून सरकारने रामराज्य आणावे: राज ठाकरे

राम मंदिर बांधून सरकारने रामराज्य आणावे: राज ठाकरे

पुणे : अयोध्या केस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आनंद देणारा आहे. या निर्णयाचे स्वागत करतो, एक धाडसी निर्णय घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करतो. राम मंदीर लवकरात लवकर बांधावे आणि सरकारने देशात रामराज्य आणावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांधी संवाद साधत साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, राम मंदिर उभारणीसाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिले, ते कुठेतरी आज सार्थकी लागले. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रश्न आज निकाली लागला.आज बाळासाहेब असते तर त्यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला असता, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version