रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर

१ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार महोत्सव!

पुणे, ८ जानेवारी २०२३ : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन ईटकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महोत्सवाचे
मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, लोकसहभागातून होणारा देशातील एकमेव महोत्सव अशी या महोत्सवाची ओळख असून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून हा महोत्सव दि. १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित केला आहे.

या महोत्सवात उद्घाटन सोहळा, रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार, रमामाई पुरस्कार याचे वितरण तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महामाता रमामाई आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला जातो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा