राणी-सैफ जोडी ११वर्षानंतर एकत्र

मुंबई: बॉलिवूडमधील मर्दानी अर्थात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान तब्बल ११ वर्षानंतर एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या सिक्‍वलच्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील आठवड्यापासून बनारस आणि बुलंदशहर येथे सुरू होणार आहे.
याआधी राणी आणि सैफ ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटांमधून एकत्र झळकले होते. जे खूप हिट ठरले होते.
दरम्यान, ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये राणी आणि सैफ मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मकडून करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा