औरंगाबाद, ३१ डिसेंबर २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने औरंगाबाद पोलीस आयुक्तांना दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बलात्काराच्या घटनेसंबंधीत निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद मधील झालेली बलात्काराची घटना ही अतिशय घृणास्पद अशी घटना आहे. एका २९ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून शिरूर कासार येथील मेहबूब शेख या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. असा सिडको पोलीस स्टेशन मध्ये २८ डिसेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.
यामध्ये संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचे नाव या घटनेत आले आहे. बलात्कारचा गुन्हा दाखल होऊन ३ दिवस झाले. परंतु, अद्यापही मेहबूब शेख या नराधमाची चौकशी करून त्यास अटक झालेली नाही. तरी पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपाती पणे या घटनेची लवकरात लवकर सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड