चीनमधून मागवलेले रॅपिड टेस्टिंग किटस सदोष

मुंबई: चीनमधून मागवलेले रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाल्यामुळेएकच खळबळ उडाली आहे. यामुळेआयसीएमआरने( भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) सर्व राज्यांना पुढचे दोन दिवस रॅपिड टेस्टिंग थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनकडून मागवण्यात आलेल्या रॅपिट किटच्या चाचणींचे निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे येत नसल्याची तक्रार काही राज्यांनी केल्यांनतर ‘आयएसीएमआर’ त्यावर काय निर्णय घेते, याची प्रतीक्षा होती. त्यानंतर या किटचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचे ‘आयसीएमआर’च्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

या किटसची तपासणी करण्यात येणार असूनपुढच्या दोन दिवसात आम्ही यासंबंधी सूचना देऊ, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून हॉटस्पॉट भागांमध्ये ७५ हजारांवर अधिक रॅपिड टेस्ट करण्यात येणार होत्या.चीनमधून मागवण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाले आहेत. चीनने पाठवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या आहेत, असा दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे.

आयसीएमआर’च्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, ‘पुढच्या दोन दिवसांत आठ संस्थांना फिल्डमध्ये पाठवून या किटची चाचणी करण्यात येईल आणि परीक्षणात काही गडबड आढळल्यास चीनच्या संबंधित कंपन्यांना त्या किटची बॅच परत पाठवून बदलून मागितली जाईल. त्यामुळे या किटचा पुढचे दोन दिवस राज्यांनी वापर करू नये. परीक्षणानंतरच ‘आयसीएमआर’ला त्यांच्या वापराविषयी स्पष्ट सल्ला देता येईल,’ असे ते म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा