राशिभविष्य

मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल. विलासी वृत्तीवर अंकूश ठेवावा लागेल. मानसिक शांती व समाधान मिळवण्यासाठी सत्संगा शिवाय पर्याय नाही.

वृषभ : शुभ रंग : निळा | अंक : ५ भागिदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : २ आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ८ कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४ तुमचा उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३ अध्यात्मिक मार्गात प्रगती होईल. विद्यार्थी अभ्यासात एकाग्रता साधू शकतील. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.

तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८ अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतीहुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ राशीच्या धनस्थानातून चंद्र भ्रमण सुरु असताना पैसा कमी पडणार नाही. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. आज काैटुंबिक जिवनांत सलोखा व मधुरता राहील.

धनू : शुभ रंग : राखाडी| अंक : ७ आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रूसवे फुगवे असतीलच.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६ कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हीताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.

कुंभ : शुभ रंग : अबोली | अंक : ५ दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. दिवस लाभाचा असल्याने व्यवसायात एखादे धाडस करायला हरकत नाही. आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला मान राहील.

मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : ९ नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी अश्वासने देऊन राबवून घेतील. कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा