व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत घट, पहा नवीन दर

5

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022: या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी अर्थसंकल्पापूर्वी एलपीजीच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळं व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले. एलपीजी सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे.

कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, किंमतीतील ही कपात आजपासून म्हणजेच 01 फेब्रुवारी 2022 पासून लागू झालीय. आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1907 रुपयांवर आली आहे. या निर्णयाला आगामी निवडणुकीशी जोडलं जात आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे.

किमतीत सुधारणा केल्यानंतर, 01 फेब्रुवारीपासून, दिल्लीत विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 899.50 रुपये होईल. कोलकातामध्ये 926 रुपयांना उपलब्ध असेल, तर मुंबईत त्याची किंमत दिल्लीच्या बरोबरीची असेल. चेन्नईमध्ये सिलिंडर 915.50 रुपयांना मिळणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दुसरीकडं, एटीएफच्या किमतीत 8.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत असल्यानं एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. एटीएफची नवीन किंमत आता 6,743.25 रुपयांनी वाढून 86,038.16 रुपये प्रति किलोलीटर झालीय. एटीएफची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा