रेकी, हिलिंग थेरपी आता गरजेची

पुणे, २१ ऑक्टोबर २०२२ : ताणतणावाच्या या जगात सध्या मानसिक शांतता मिळणं जरा कठीणचं. त्यामुळे अनेक प्रश्न न सुटताच तसेच राहतात. यासाठी आता खास रेकी आणि हिलींगसारख्या थेरपी सध्या प्रचलित आहेत. पण या थेरपी नक्की काय यावर एक नजर टाकूया…

रे की आणि हिलींग या मुळात जपानी थेरपी असून या थेरपी अतिशय प्रभावशाली आहेत. रे म्हणजे विश्व आणि की म्हणजे जगातील एनर्जी. ज्याचा वापर करुन तुम्ही विविध आजार बरे करु शकतात. तर प्राणिक हिलींग म्हणजे प्राणवायूचा वापर करुन त्यातून एनर्जीचा स्त्रोत निर्माण करुन आजारांना बरे करणे, अशा प्रकारची ही पद्धत आहे.

वास्तविक हा विषय खूप गंभीर आणि मोठा आहे. पण याचे फायदे आता जाणून घेऊयात.

१. स्ट्रेस, ताण-तणाव मुक्त करण्यासाठी , मनाची घालमेल थांबवण्यासाठी या थेरपीचा वापर होतो.

२. शांत झोप लागण्यासाठी या थेरपीचा वापर करता येतो.

३. कॅन्सर किंवा इतर शस्त्रक्रिया झालेल्यांसाठी या थेरपी उपयुक्त ठरतात. त्यांना पेनलेस थेरपी असंही म्हणतात.

४. एनझायटी अर्थात भीती सारखी भावना नष्ट करण्यासाठी रेकी उपयुक्त ठरते.

५. एकाग्रता वाढवण्यासाठी अशी थेरपी उपयुक्त ठरते.

६. तुमचे मनोस्वास्थ नीट करण्यासाठी रेकी आणि हिलींगचा वापर होऊ शकतो.
सध्याच्या काळात अशा थेरपी जास्त महत्त्वपूर्ण ठरत आहे, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा