राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन वाटपावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्यात आले आहे. यामध्ये १२ जण जखमी असून यातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पिंपरी येथील डीवाय पाटील रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. तर आठ जणांना खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे. दुसऱ्या गटाने घरातील संसारोपयोगी वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
वाशेरे येथे रेशन दुकानदारावर ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. याबाबत खेड तहसीलदार यांनी गावात भेट देऊन तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच खेड पोलिसापर्यंत या तक्रारी आल्या होत्या. त्या ठिकाणीही या गावातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र एका गटाने रेशन दुकानदारांवर जाऊन रेशन दुकानदार यांच्याशी बाचाबाची करून रेशन दुकानावर हल्ला केला. दुकानातील रॉकेलचे डबे फेकून दिले. तसेच सात ते आठ जणांना काट्या कोयता लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली तर दुसऱ्या गटाने गावातील काही ठिकाणी हल्ला करून घरातील संसारोपयोगी वस्तू , चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
या हल्ल्यात एकूण बारा जण ते पंधरा जण जखमी झाले आहेत. खेड पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे .या बाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करत आहेत.
प्रतिनिधी – सुनील थिगळे