India Vs Pakistan, २९ ऑगस्ट २०२२: आशिया चषक २०२२ मध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने तुफानी खेळी खेळली आणि शेवटच्या षटकात षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला १४८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने ५ गडी राखून पूर्ण केले.
भारत-पाकिस्तान सामन्याचा झटपट आढावा-
पाकिस्तान – १४७/१० (१९.५ षटके)
भारत – १४८/५ (१९.४ षटके)
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या.
भुवनेश्वर कुमारने २६ धावांत ४, हार्दिकने २५ धावांत ५ बळी घेतले.
भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने मात केली, अखेरच्या सामन्यात हार्दिकने विजयी षटकार ठोकला.
हार्दिक पांड्याने १७ चेंडूत ३३ धावा केल्या, रवींद्र जडेजानेही 35 धावांची दमदार खेळी केली.
विश्वचषकाचा बदला पूर्ण
T20 विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली आणि त्या सामन्यानंतर अवघ्या दहा महिन्यांत भारताने आपला बदला पूर्ण केला आहे. आशिया चषकाच्या या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. T20 विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिला सामना होता.
हार्दिक-जडेजाच्या अप्रतिम खेळीने सामना जिंकला
IPL २०२२ नंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा हार्दिक पंड्या हा सर्वात मोठा सामना विजेता म्हणून समोर आला आहे. टीम इंडिया अडचणीत असताना हार्दिक पांड्याने क्रीजवर येऊन रवींद्र जडेजासोबत भागीदारी केली. हार्दिकने आपल्या धमाकेदार खेळीत १७ चेंडू खेळले आणि ३३ धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि एका विजयी षटकाराचाही समावेश होता.
हार्दिकशिवाय रवींद्र जडेजानेही २९ चेंडूत ३५ धावा करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. रवींद्र जडेजाने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले. अष्टपैलू फलंदाज म्हणून उतरलेला रवींद्र जडेजा या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तान अपयशी
नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले, त्यामुळे त्याची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार बाबर आझम अवघ्या १० धावा करून बाद झाला, त्याला भुवनेश्वर कुमारने पायचीत केले. काही वेळातच फखर जमानही १० धावा करून बाद झाला. यानंतर मोहम्मद रिझवानने इफ्तिकार अहमदसोबत छोटीशी भागीदारी केली.
मोहम्मद रिझवान (४३ धावा) एका बाजूने खेळत राहिला, पण दुसऱ्या बाजूने भारताने पाकिस्तानला धक्के देणे सुरूच ठेवले. शेवटी, शाहनवाज दहानीने ६ चेंडूत १७ धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या १४७ पर्यंत पोहोचली. पाकिस्तानकडून अनेक खेळाडूंना सुरुवात झाली, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
टीम इंडियासाठी भुवनेश्वरने ४ षटकात २६ धावा देऊन ४ बळी घेतले, ज्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (१०) च्या विकेटचा समावेश आहे. त्याचवेळी हार्दिकने ४ षटकात २५ धावा देत ३ बळी घेत पाकिस्तानी मधल्या फळीचे कंबरडे मोडले. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३३ धावांत २ बळी घेतले. भारत-पाकिस्तान सामन्यात खेळण्याचा अर्शदीपचा हा पहिलाच अनुभव होता. वेगवान गोलंदाजांनी भारताच्या सर्व १० विकेट घेतल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे