भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंत आशिया कप खेळू शकणार नाही…!

Rishabh Pant ruled out of Asia Cup 2025
भारतीय संघाला मोठा धक्का !

Rishabh Pant ruled out of Asia Cup 2025: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी क्रिकेटची मालिका सुरू आहे. यातच टीम इंडियाला धक्का बसणारी माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि शानदार फलंदाज रिषभ पंत ‘ओव्हल’ येथे खेळवण्यात येणाऱ्या पाचव्या कसोटीतून बाहेर बसणार आहे. अशी माहिती भारतीय क्रिकेट निमायक बोर्डाने(BCCI) ने काल रात्री उशिराने दिली. याशिवाय त्याच्याजागी तमिळनाडूनच्या खेळाडूची निवड केल्याची माहिती प्रसारित केली.

इंग्लंड विरुद्ध मॅचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंतला पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळ त्याला मैदान सोडावे लागले होते. तथापि, दुसऱ्या दिवशी देखील तो मैदानात फलंदाजी करताना दिसला. पाय फ्रॅक्चर असताना देखील त्याने अर्धशतक झळकावले होते.

पंत आशिया कपला मुकणीची शक्यता

पंतच्या पायाला झालेल्या दुखपतीमुळे तो सहा आठवड्यासाठी क्रिकेटमधून बाहेर पडला आहे. भारतीय संघाच्या उपकर्णधारची ही दुखापत अशा वेळी झाली आहे. जेव्हा संघाला पुढील काही महिन्यात महत्वाचे स्पर्धा खेळायचे आहेत. आशियाकप 9 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे टेंशन आणखीन वाढले आहे. अशा परिस्थितीत, पंत भारतासाठी 3 ते 7 टी-20 आंतराष्ट्रीय सामने गमवु शकतो.

न्यूज अनकट प्रतीनिधी, प्रथमेश पाटणकर