१० फेब्रुवारी २०२५ कटक : भारत आणि इंग्लंड मध्ये कटकमध्ये दूसरा एकदिवसीय सामनाम खेळवण्यात आला. यामध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा ४ गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. मागच्या काही दिवसापासून फॉर्मशी झुंज देणारा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात विजयाचा हीरो ठरला. त्याने ९० चेंडूत ११९ धावांची शानदर खेळी केली.ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७ षटकार ठोकले. याशिवाय सलामीवीर शूबनम गिलने सुद्धा अर्धशतकांची खेळी शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.याशिवाय रवींद्र जडेजाने गोलंदाजीत ३ विकेट्स घेत महत्वाची भूमिका बजावली.
कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करत असताना ४९.५ षटकात १० गडी गमावून ३०४ धावा केल्या होत्या. ज्यात बेन डकेट आणि जो रुट यांनी अर्धशतकी खेळी केली.या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या झुंजावती शतकासह ४४.३ षटकांत हे लक्ष पूर्ण केले. टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिली. रोहित आणि शूबनम गिल यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी १३६ धावांची भागीदारी राहिली.
एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. त्याने केवळ ५ धावा केल्या आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर रोहित शर्मासोबत श्रेयस अय्यरने शानदर भागीदारी केली. त्याने ४४ धावांची आक्रमक खेळी केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ७६ चेंडूत आपले ३२ वे शतक पूर्ण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर