मुंबई, २१ ऑक्टोबर, २०२२ : गेले अनेक दिवस शेअर बाजारात होणारी घसरण, उतरता रुपया यामुळे शेअरबाजारात मंदी होती. मात्र आज रुपयाने उसळण घेतली. प्रति डॉलरची ८२.७५ एवढी किंमत झाली असून त्यामुळे शेअरबाजार जरा आनंदात दिसू लागला आहे. मात्र अमेरिकी डॉलरची किंमत काहीशी कमी झालेली दिसली.
शेअर बाजारातल्या वाढीचा परिणाम रुपयावर झाला. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय तेलाची किंमत वाढल्यामुळे रुपयाची किंमत घसरली होती. मात्र विदेशी चलन बाजारात अमेरिकी डॉलरची किंमत ८३.०५ किंमतीवर उघडला. नंतर परत रुपयात घसरण होत होती. पण बाजार बंद होत असताना अखेर ८२.७५ रुपयावर डॉलर स्थिरावला.
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत प्रती बॅरल ९३.४९ एवढी झाली. म्हणजेच प्रतीबॅरल १.१७ टक्के वाढ झाली. त्यामुळे डॉलरमध्ये वाढ झाली. त्याचा परिणाम रुपयावर होऊन रुपया घसरत होता. पण आता अखेर गुरुवारी रुपया वाढला आणि त्याच किंमतीवर बाजार बंद झाला.
त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात तेजी दिसेल आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल, असं चित्र दिसण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस