रुपया पुन्हा गडगडला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर २०२२: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे पुन्हा एकदा ऐतिहासिक अवमुल्यनं झाले आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.२२ रुपयांनी घसरला. म्हणजेच एका डॉलरचे मूल्य ८२.२२ रुपये इतके झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत आजचा रुपयाचा दर हा ३२ पैशांनी घसरला आणि ८२.२० रुपयांच्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर उघडला. जो काल ८१.८८ रुपये इतका होता.

या कॅलेंडर वर्षात भारतीय रुपया दहा टक्क्यांहून अधिक घसरला आहे आणि २०२२ मध्ये तो १०.६० टक्क्यांनी तुटला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने या वर्षी सातत्याने व्याजदर वाढवल्यामुळे डॉलर सतत मजबूत होत आहे आणि त्यामुळे उदयोन्मुख बाजारांच्या चलनासह भारतीय रुपयाची घसरण दिसून येत आहे.

काय परिणाम होईल …

रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आता आयात महाग होईल. त्यामुळे परदेशातून येणारे कच्चे तेल, मोबाईल, ग्राहकोपयोगी वस्तू आदी वस्तू महाग होणार आहेत. रुपया कमकुवत झाला तर परदेशात शिक्षण घेणे, उपचार घेणे आणि प्रवास करणेही महाग होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा