साडेतीन तासांतही रशिया-युक्रेनमध्ये सलोखा नाही, काय करणार आता पुतीन?

रशिया आणि युक्रेन युद्ध, १ मार्च २०२२ : युक्रेनवरील रशियन हल्ल्यांदरम्यान, दोन्ही देश आता वाटाघाटीच्या टेबलावर आले आहेत. सोमवारी रशिया आणि युक्रेन यांनी बेलारूसमध्ये चर्चा केली, जेणेकरून युद्धाचा मुद्दा सोडवता येईल. ही चर्चा सुमारे साडेतीन तास चालली. मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती अद्याप रुळावर येताना दिसत नाही. आगामी काळात हे हल्ले थांबतील की वाढतील याबाबत काहीही सांगणे कठीण आहे.

चर्चेची एक फेरी संपल्यानंतर चर्चेची दुसरी फेरीही होणार आहे. मात्र चर्चेनंतरच रशियाने युक्रेनच्या कीव आणि खार्किववर हल्ला केला. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी EU मध्ये सामील होण्यासाठी सदस्यत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतच्या करारासाठी ३ अटी ठेवल्या आहेत.

बेलारूस-पोलंड सीमेवर होईल पुढील बैठक

शिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी सोमवारी बेलारूसमध्ये चर्चेसाठी एकत्र आले. मात्र आता चर्चेची दुसरी फेरी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता दोन्ही देशांचे संवादक आवश्यक सल्लामसलत करण्यासाठी आपापल्या देशात जातील, तर रशियन शिष्टमंडळाच्या सदस्याचे म्हणणे आहे की आता पुढील बैठक त्या मुद्द्यांवर होईल ज्यामुळे ठोस तोडगा निघेल. त्याच वेळी, बेलारूसमध्ये झालेल्या चर्चेत रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले की, आता रशिया-युक्रेनची पुढील बैठक बेलारूस-पोलंड सीमेवर होणार आहे.

कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला

दोन्ही देशांच्या बैठकीनंतर रशियाकडून पुन्हा युक्रेनला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे रशियन सैन्याने राजधानी कीव आणि खार्किवमध्ये पुन्हा हल्ला केला. रशियन बाजूने सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे कीव शहर हादरले. कीवमध्ये सायरन वाजत आहेत. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर जोरदार हल्ला केला आहे. कीवमध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. राजधानी कीव अनेक स्फोटांनी हादरली आहे. अनेक भागात एकामागून एक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. हे स्फोट क्षेपणास्त्र हल्ल्याचे सांगितले जात आहेत. कीवमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा