संकर्षण कऱ्हाडे च्या नाटकाच्या प्रयोगावेळी पुण्यात काय घडलं ?

Sankarshan Karhade viral video pune
संकर्षण कऱ्हाडे च्या नाटकाच्या प्रयोगावेळी पुण्यात काय घडलं ?

Sankarshan Karhade viral video: मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय अभिनेता असून सध्या तो दोन नाटकांद्वारे प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करत आहे. कुटुंब किर्रतन आणि नियम व अटी लागू ही संकर्षण ची दोन नाटक सध्या रंगभूमीवर चांगलीच गाजतायत. या नाटकांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. संकर्षण सोशल मीडियावर त्याच्या नाटकाबद्दल, चाहत्यांबद्दल आणि त्याचे वैयक्तिक अनुभव शेअर करत असतो. आणि आत्ता परत एकदा त्याने सोशल मीडियावर एक सुंदर पण डोळ्यात पाणी आणणारा अनुभव शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्ट या नेहमीच चर्चेत असतात आत्ता नुकतंच संकर्षण कऱ्हाडेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत दोन आजी बोलताना दिसतायत. त्यातील एक आजी संकर्षणला सांगतायत की, ‘आम्हाला तुझं बोलणं अतिशय आवडतं आणि कवितांची आवड आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.’ संकर्षण त्यांना विचारतो, ‘आज नाटकाला आलात का’ तर त्या म्हणतायत, ‘नाही , तुला भेटायला. पण आता यायची इच्छा झालीये.’

हा व्हिडिओ शेअर करत संकर्षणने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आज पुण्यात “नियम व अटी लागू…” प्रयोगाआधी २ आज्ज्या आल्या…दोघीही वयाने ८० आसपास असतील…मला वाटलं प्रयोगाला आल्या असतील… तर म्हणाल्या “आम्ही वृद्धाश्रमात राहातो आम्हाला वेळेत परत गेलं पाहिजे…आणि ३ तास आम्ही तब्येतीमुळे बसू शकत नाही पण तुला फक्तं भेटायला आलोय” भरभरून बोलल्या…आशीर्वाद दिले…आणि निघून गेल्या…फक्त भेटीसाठी आॅटो करुन आल्या होत्या… मी मुद्दाम जातांना त्यांना माझ्या गाडीने पाठवलं … फार गोड वाटल

दरम्यान, संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना घरी पाठवलं, त्याच्या या कृतीचं चाहत्यांनी आणि कलाकारांनी कौतुक केलं आहे. संकर्षणला लोकप्रिय अभिनेता याचसाठी म्हटलं जातं. तो अनेक मुलाखतीमध्ये त्याचे काही किस्से सांगतो, जे प्रत्येकाला रिलेटेबल वाटत आणि प्रत्येक चाहता त्याच्याशी जोडला जातो.

न्यूज अनकट प्रतिनिधी, इंदिरा तेंडोलकर