जालना ७ एप्रिल २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक अनुषंगाने जालना जिल्ह्यातील पाहिजे आरोपी, फरार आरोपी व एम.पी.डी.ए कायद्या प्रमाणे स्थानबध्दता आदेश झालेल्या इसमांचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सुचना दिल्या होत्या. या मोहिमेत जालन्यातील फरार आरोपी संतोष दानवे अखेर जेरबंद झालाय.
पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी, पोलीस ठाणे हसनाबाद येथील आरोपी व एम. पी.डी.ए. कायद्या अंतर्गत स्थानबध्द आदेश झाल्यानंतर मागील दोन वर्षापासुन फरार असलेला आरोपी संतोष भानुदास दानवे रा. जवखेडा ता. भोकरदन याचे शोधा बाबत एक विशेष पथक नेमले. त्या प्रमाणे आज पहाटे छत्रपती संभाजीनगर शहरात फरार आरोपी संतोष भानुदास दानवे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे हसनाबाद येथे हजर केले आहे. सदर आरोपी हा पोलीस ठाणे हसनाबाद येथील गुरनं 205/2022 कलम 379,34 भादंवि मध्ये पाहिजे आरोपी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी