जळगाव मतदारसंघातील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रशिक्षण

जळगाव ७ एप्रिल २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत १८ पाचोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण आज दि. ७ एप्रिल २०२४ रोजी पाचोरा येथे भूषण अहिरे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे अध्यक्षतेखाली गो. से. हायस्कुल, गिरड रोड, पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव येथे दोन सत्रात आयोजित करण्यात होते. तसेच आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगांव यांनी प्रशिक्षणास भेट देवून वर्ग खोल्यांमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण भेट देवून मास्टर ट्रेनर व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ, गिरड रोड, पाचोरा स्थित असलेल्या स्ट्रॉग रुमची पाहणी केलेली आहे.

सदर प्रशिक्षणास एकूण १८७९नियुक्त मतदान अधिकारी, पहिले सत्र सकाळी ९ ते १ वाजे पावेतो व दुसरे सत्र दुपारी २ ते ६ वाजे पावेतो प्रशिक्षणास हजर होते. तसेच प्रशिक्षणास गैरहजर असलेले एकूण ९०नियुक्त मतदान अधिकारी हे गैरहजर असून संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा देण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसेच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणेकामी २० वर्ग खोल्यांमध्ये मास्टर ट्रेनर यांचेद्वारे प्रत्यक्ष EVM / VVPAT हातळणीबाबतचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूककामी नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी पोस्टल बॅलट / EDC फॉर्म भरुन दिलेले आहेत. प्रशिक्षणानंतर नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक विषयक परिक्षा घेण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा