मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोली जवळ बोरघाटात आज सकाळी टँकरचा आणि टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पण आता वाहतूक सूरळीत झाली आहे.
या आपघाताची घटनास्थाळावरुन मिळालेली माहिती अशी आहे की एक्सप्रेस हायवेवर खोपोली जवळील बोरघाटात मुंबई लेनवर एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरने पुढे चाललेल्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. टेम्पो पुढे चाललेल्या कारला धडकला.
या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने खोपोलीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात टेम्पोचा आणि कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला आहे.
त्या गाडीत गॅस नसल्याने मोठा धोका टळला आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पण वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, वाहतूक सूरळीत करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर