मुंबई, २४ जानेवारी २०२१: ” अच्छे दिन साठी आता सात रूपये बाकी”‘ सोशल मिडियावर पेट्रोल दरवाढीमुळे मुळे अश्या पद्ध्तीची ओळ ट्रोल होत आहे. देशात दर दिवशी पेट्रोल चे दर वाढत आसून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे. पेट्रोल ने नव्वदीचा आकडा ओलंडला असून आता १०० री कडे वाटचाल केल्याचे चित्र होत असून आता १०० रूपयासाठी ७ रूपये बाकी आहेत.
मोदी सरकारच्या काळात पेट्रोल दर कमी होणार असे एका भाषणात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केले होते. मात्र नरेंद्र मोदी यांची सत्ता आली आज घडीला पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच नाही तर डिझेलच्या किंमती मधे वाढ होत आहे. तसेच आता जनता भाजप खासदार स्मृती इराणी यांना ही प्रश्न विचारत आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात भाजपने इंधन दरवाढ विरोधात जोरदार आंदोलन केले होते. तर आता ते सरकार मधे असताना महागाईने डोके वर काढले असून इंधन दरवाढीत तर दिवसाला वाढ होत आहे. तर काल पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमती मधे वाढ झाली आहे.
मध्य प्रदेशच्या भोपाळ मधे काल पेट्रोलचे भाव लिटरमागे ९३.५९ रू आहे तर डिझलचे भाव ८३.८५ प्रति लिटर झाली आहे. तर दिल्ली मधे ८५.७० प्रति लिटर आणि डिझेल ७६.८८ प्रति लिटर आहे. महाराष्ट्राची अर्थिक राजधानी मुंबई मधे पेट्रोल प्रति लिटर ९२.२८ रूपये तर डिझलचे भाव ८२.६६ रूपये लिटर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव