शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव
होते.
पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. १७व्या शतकाच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय
पराक्रम गाजन पुरंदर, तोरणा, सिंहगड, राजगड ह्यासारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले. मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती.
शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्याप्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला.
पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.