शरद पवार आणि सायरस पुनावाला मैत्रीचे रसायन

43

पुणे : पुण्यामध्ये सोमवारी (दि.१६) रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळांना सायरस पुनावाला आणि विलू पुनावाला असे शाळांचे नामकरण करण्यात आले. यावेळी पुनावाला यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पुनावाला यांनी शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास तेथे उपस्थित असणाऱ्यांना सांगितला. तसेच त्यांनी पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत, याचाही उलगडा पुनावाला यांनी यावेळी केला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या राजकारणामुळे क्षमता असूनही शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच पवार यांनी आपला वर्गमित्र असलेल्या पूनावालांची विद्यार्थी दशेतील आठवणी उपस्थितीताना सांगितल्या. विशेष म्हणजे पवार यांची स्मरणशक्ती किती तल्लख आणि अचूक आहे याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा एकदा आला. यावेळी शरद पवारांनी आपले खास मित्र असलेल्या सायरस पूनावाला यांच्या मैत्रीचे धम्माल किस्से सांगितले आणि शाळेतली सगळीच मुलं पोट धरून हसायला लागली. त्याचबरोबर पवारांनी मुलांना फक्त मार्क्स मिळवणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं नाही. तर जीवनाच्या शाळेतही तुम्ही यशस्वी झालं पाहिजे असं सांगत आपल्या आठवणी सांगितल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा