शरद पवार आणि सुशील कुमार शिंदेंमुळे कोरोना वाढला : संतोष पवार

सोलापूर, दि.७जून २०२०: राज्यातील सर्वाधिक रुग्ण संख्येच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याचा पहिल्या दहा मध्ये नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे जबाबदार असल्याचे मत भाजपचे नेते संतोष पवार यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार यांना माढा येथे लोकसभेच्या उमेदवारीसाठी विरोध केला होता. तसेच सुशीलकुमार शिंदे यांना जिल्ह्यातील नागरिकांनी दोन वेळा पराभूत केले होते. याचा हे दोन्ही नेते सूढ घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी संतोष पवार म्हणाले, “सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री नाही. कारण माढा लोकसभेच्या वेळी शरद पवारांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील लोकांनी केलेला विरोध होय. याचाच सूड म्हणून पवार कुटुंबांने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेत २ वेळा येथील नागरिकांकडून पराभूत केले गेले म्हणून त्यांनी जनतेच्या विरोधात सूड उगवला आहे. या दोन्ही नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून सोलापूरची वाताहत झाली आहे. आता या दोघांनी एकत्र येऊन सोलापूरचे प्रशासन हातात घेऊन सोलापूरची परिस्थिती व्यवस्थीत करायला हवी आहे.” संतोष पवार यांनी या दोन्ही नेत्यांना जिल्ह्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा