शेंगदाणे आणि गूळ खा…निरोगी रहा!

आजच्या धावपळीच्या जमान्यात आपण सर्वजण पौष्टीक खाणे जवळ जवळ विसरलोच आहोत. त्यामुळे आपण वेळेनुसार काही तरी फास्ट फूड खातो.त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे मग आजाराला सामोरे जावे लागते. परंतु आपल्याला माहीत आहे का गूळ आणि शेंगदाणे याचे फायदे आपल्याला माहीत आहे का? ज्यामुळे आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. चला मग जाणून घेऊन या गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे…

शेंगदाणे आणि गूळ दोघांमध्ये असे न्यूटिएंट्स असतात. जे बऱ्याच आजारांपासून आपला बचाव करण्यास मदत करतात. प्रतिकार शक्ती वाढवतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केले पाहिजे.
तसेच गूळ आणि शेंगदाणे खाल्ले तर कोलेस्टरॉल नियंत्रित राहते. शेंगदाण्याची चिक्कीमध्ये ‘मोनो सॅचुरेटेड फॅटी ऍसिड्स’आणि ‘ओलेईक ऍसिड’ असते. यामुळे कोलेस्टरॉल लेवल नियंत्रित राहत. हे कोरोनरी डिसीजपासून आपला बचाव करण्यास मदत करतो.

याशिवाय एक्जिमापासून बचाव करण्यास गूळ आणि शेंगदाणे फायदेशीर ठरतात. यात एंटी अंफ्लेमेटरी गुण असतात जे सोरायसिस आणि एक्जिमासारख्या आजारांपासून बचाव करतात. याशिवाय शेंडण्याच्या चिक्कीत व्हिटॅमिन इ असल्यामुळे स्किनला चमकदार बनवतो.

तसेच माथा शार्प आणि तेज ठेवण्यास याची फार मदत होते. यात एंटीऑक्सीडेंट्स आणि फायोफिनॉल असत जे ब्लड क्लाटपासून बचाव करतो.ही चिकी डिम्नेशिया आणि अल्जाइमरच्या धोक्याला कमी करण्यास मदत करते. तसेच मस्तिष्क तेज करणे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे विविध आरोग्यासाठी चांगले असणारे काही गुण आढळून येतात. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जाते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा