छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोर्यगाथेवर आज पर्यंत अनेक चित्रपट मालिका आल्या आहेत. त्यात अनेकांनी राजांबद्दलचा इतिहास आपल्या पध्द्तीने मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही ठराविक चित्रपटांनी आणि मालिकांनी इतिहास रचला. त्यातील काही महत्वाचे चित्रपट.
■ बाळ शिवाजी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लहानपणीच्या पराक्रमावर आधिरित बाळ शिवाजी हा चित्रपट आहे. 1981 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
■ छत्रपती शिवाजी – महाराजांच्या पराक्रमावर आधिरित हा चित्रपट आहे. 1952 मध्ये महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला.
■ कल्याण खजिना – शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना कसा लुटला यावर आधारित हा चित्रपट आहे. 1924 मध्ये प्रदर्शित झाला.
■ प्रभो शिवाजी राजा : शिवाजी महाराजांवर आलेला पहिला अॅनिमेटेड चित्रपट होतो. २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
■ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय – अन्यायाशी लढण्यासाठी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात हे सिनेमातून दाखवण्यात आले आहे. २००९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
■ शेर शिवाजी – १९८७मध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट आला होता.
■ स्वराज्य सीमेवर- १९३७ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
■ फर्जंद- शिवरायांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा यामध्ये दाखवण्यात आली आहे.
■ फतेशिखस्त – महाराजांच्या पराक्रमाची व गनिमी गाव्याच्या युद्धनीतीची विस्तृत मांडणी या सिनेमातून दाखवण्यात आली आहे.
■ तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ : कोंढाणा किल्याची शौर्यकथा या मध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी केली आहे.