गोल पोस्ट राजकारण शिवसेनेला पडला बाळासाहेबांचा विसर

शिवसेनेला पडला बाळासाहेबांचा विसर

पुणे: सध्या सत्ता स्थापनेवरून शिवसेना खूपच आग्रही असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री हवा म्हणून त्यांनी युती तोडली. त्याच नुकत्याच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकला नसल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडत चालल्याचे पहायला मिळत आहे.

ज्यांनी सामना सुरू केला त्यांचाच यावर फोटो नाही.त्यामुळे शिवसैनिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सामना सारख्या मुखपत्रातूनच अशा प्रकारची गोष्ट घडते, त्यामुळे सामना पेपर नक्की बाळासाहेबांना विसरत चालला आहे.अथवा त्यांच्या बद्दल शिवसेनेतील वरिष्ठांना अजिबात आस्था राहिलेली नाही. हे या जाहिरातीवरून दिसून येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version