वाशिम जिल्ह्यात ” दुकान आपल्या दारी ” उपक्रम

वाशिम, दि.६ जून २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शहरातील लोकांची गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने वाशिमचे जिल्हाधिकारी ॠषिकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोडच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे व विजयमाला आसनकर यांनी पुढाकार घेऊन ‘शॉप अ होम’ या अ‍ॅपचा शुभारंभ केला आहे.

या अ‍ॅपमुळे ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूंचा घरपोच पुरवठा होणार आहे. आणि यामुळे शहरातील गर्दीचे प्रमाण कमी होणार आहे. या अ‍ॅपमध्ये सध्या व्यवसायिकांची नोंदणी चालू आहे.

या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना कोणतेही रजिस्टेशन करायचे नाही. ग्राहकांनी https :// visanet.in/shop At Home/mobileapp/main.php या लिंकवरून डाऊन लोड करून घ्यावे.कोराेनापासून आपला बचाव करण्यासाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी घरपोच सेवेचा लाभ घ्या, घरीच रहा सुरक्षित रहा, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

या अ‍ॅपची निर्मिती विसा नेट वाशिमने केली आहे. या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा विजयमाला आसनकर, मुख्याधिकारी गणेश पांडे, नगरसेवक पप्पीबाई कदम, कृष्णा महाराज आसनकर यांची उपस्थिती होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा