श्रुती फिल्म प्रस्तुत “तूच माझी साक्षी” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित

नागपूर, ११ मे २०२४ : शेतकऱ्यांच्या समस्या व साक्षीच्या प्रेमाची कबुली देणारा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट पडद्यावर येण्याकरिता २०१७ पासून लेखक/ निर्माता/ दिग्दर्शक विलास गाडगे यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यांना व्यवहाराची देवाण घेवाण त्यातूनच आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. आज या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊन ७ वर्ष झाली. थेंबे-थेंबे तळे साचून आणि आर्थिक बाजू नसतांनाही परत एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा करून तसेच कर्ज बाजारी होऊन त्यांनी हा चित्रपट रिलीज करिता यांनी सज्ज केला आहे.

या चित्रपटामध्ये  सावकाराच्या जाचाला कंटाळून रामू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. परंतु रामुची पत्नी राधाच्या हिमतीने परत तो लोकांशी लढून आणि समाज कंटकांशी लढून आपल्या परिस्थितीवर मात करतो. रामुची बहीण साक्षी ही गर्भ श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडते. असा हा साक्षीला साक्ष देणारा मराठी चित्रपट ३१ मे २०१४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जसे या चित्रपटामध्ये दृश्य घडले आहे असेच काही दृश्य लेखक/निर्माता /दिग्दर्शक विलास गाडगे यांच्या जीवनामध्ये घडले आणि घडत आहे. असे विषय सरासरी प्रेक्षकांच्या हिताचे कुणीच मांडण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु यांनी जो प्रयत्न केला आहे तो खरचं कौतुकास्पद आहे.

यातील सर्व कलाकार विदर्भ आणि मराठवाड्यातील असून त्यांनी यात उत्कृष्ट काम केले आहे. संगीतकार अभिराम व गायक / गायिका यशश्री भावे, श्रुती चौधरी, मुकुल पांडे, अभिजित कौसंबी गीतकार – रोशन गौतम (पंडित) आश्रुबा सोडणर, कैलास भारस्कर हे आहेत.

या चित्रपटातील सर्व गाणी मंत्रमुग्ध करणारी असून सद्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत. तसेच यातील कलाकार – संदीप बुरडकर, प्राची सरकार, राहुल बारापात्रे, आकांक्षा साखरकर, सुनील हिरेखन, अजय राज, राणी बलवीर, सुजित मोरे, उर्मिला विभुते, कंचन कांबळे, देवेंद्र ढिवरे, अविनाश जावळकर, मीनाक्षी खरात, रोशन जाधव, शुभम यंगल, नरेश घोडके, दुर्गेश्वरी कछवाह, ललिता घनसावंत, उत्तम घुगे, दीपक कांबळे, दीपक डफाडे, विकास देसाई, बाळू सरोदे, कैलास भारस्कर, संजय सावंत, अमित राठोड, देवकीनंदन, राजू केदार, अरविंद वाघधरे, खुशी विभूते, तेजस्विनी राठोड, संजय तेजनकर, आश्रुबा सोडणर, रवींद्र खरात, महेश ठाकरे, आकांक्षा देशमुख, अनिल गावंडे, अनंत हटवार, मोरेश्वर खोडे, मधुकर हटवार, संतोष साळुंखे, तेजस गाडगे कॅमेरामॅन-सुभाष जयस्वाल ऑफिस सुपर व्हिजन-शारदा गजभिये, प्रोडक्शन मॅनेजर -अशोक अंबागडे कोरीयो ग्राफर -मंगेश देवके, संकलन-भूपी / विरप्रसाद, असिस्टंट डायरेक्टर -प्रकाश सिंह, आशिष मेश्राम, पोस्ट प्रोडक्शन-शंकुंतलम स्टुडिओ मुंबई, कार्यकारी निर्माता-शीतल गाडगे, तेजस गाडगे विशेष सहकार्य-संगीता गाडगे व या मराठी चित्रपटात इतरांचाही सहभाग आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा