काँग्रेस कडून शेतकरी व कामगार कायदा विरोधात स्वाक्षरी मोहीम 

पुणे, २७ ऑक्टोबर २०२०: भाजप सरकार लादत असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर विविध संघटना, पक्ष ह्या कायद्याचा निषेधार्थ आवाज उठवत आहेत. संपूर्ण राज्यभर कॉंग्रेस पक्षाकडून जनजागृती व स्वाक्षरी  मोहीम राबवली जात आहे. शेतकरी व कामगार विरोधी कायदा विरोधात कॉंग्रेसने २ कोटी लोकांचा स्वाक्षरी घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

शेतकरी व कामगार कायद्यातील होणारे बदल हे कसे कामगार व शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहेत ह्याची जनजागृती मोहीम काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे. ह्याच मोहिमेचा भाग म्हणून पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भाजपा सरकार लादत असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायदा निषेधार्थ जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

शेतकरी व कामगार विरोधी कायदा निषेधार्थ जनजागृती व स्वाक्षरी मोहीम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा नेतृत्वाखाली राबवण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा