सोलापूर,दि. २६ एप्रिल २०२० : सोलापूर जिल्हा काही दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये होता. आता मात्र सोलापूरमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. पाहता पाहता ५० चा आकडा पार केला आहे. प्रशासन युद्ध पातळीवर राज्यात काम करत असताना काही ठिकाणी मात्र भोंगळ कारभार देखील समोर येत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा आधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने अमंलबजावणी केली आणि शासकीय रुग्णालयातील ए वाॅर्ड कोरोना संशयीत व बाधितांच्या उपचारासाठी रिकमा करण्यात आला. मात्र रुग्णालयात आयसोलेशन वाॅर्ड मध्ये रुग्ण चक्क जमिनीवर झोपत असल्याचे दृश्य समोर आले आहे . त्याचबरोबरच रुग्णालयामधे प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.स्वच्छतागृहांमध्येही प्रचंड घाण पहायला मिळत आहे. रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध ठिकाणी टिव्ही,पंखे, कुलर अश्या विविध उपकरण्याची सोय केली जाते. तर डाॅक्टरांसाठी पीपीई किटची देखील सोय केली जाते. इथे ती करण्यात आली आहे. असे रुग्णालयाचे आधिष्ठाता डाॅ ठाकूर यांनी सांगितले.मात्र एका रुग्णाने छुप्या पद्धतीने आपल्या मोबाइलमध्ये रुग्णालयातील फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केलेे. ज्यामध्ये रुग्णालयातील अस्वच्छता स्पष्ट दिसत आहे. तर रुग्णाला बेडच्या स्वरुपात जमिनीवर गादी टाकून देण्यात आली आहे.एकीकडे आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या जेवणात आळ्या आढळून आल्याचे प्रकरणसमोर आले असताना, आता सोलापूर शासकीय रुग्णालयाची ही दूरवस्था असल्याने रुग्ण प्रशासनाला सहकार्य करतील का? असा प्रश्न आता समोर येत आहे.