सोलापूर महानगरपालिकेचा ऑनलाइन कर भरा व सहा टक्के सवलत मिळवा

7

सोलापूर, दि.२६ मे २०२०: महापालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षाची मिळकत कराची बिले वाटण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षाचे बिल थेट भरल्यास पाच टक्के तर ऑनलाईन भरल्यास सहा टक्के सवलत मिळणार आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत ही सवलत असणार आहे.

तसेच थकबाकी असलेल्या मिळकतदारांना ही सवलत मिळणार मिळणार नाही. कोरोना महामारीमुळे मिळकत कराची बिले ही घरी पोहचवली जाणार नाहीत. तर कराची माहिती ही मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

डिजिटल पेमेंट मिळकतकर भरल्यास सहा टक्के सवलत दिली जाणार आहे. ऑनलाइन पेमेंट साठी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर सुविधा करण्यात आली आहे. बिले न मिळाल्यास महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून आपल्या मिळकतीचा क्रमांक टाकून बिले डाऊनलोड करून घ्यावीत. मिळकतकराच्या बिलावर क्यु आर कोडचीही सुविधा असल्याने ऍप्सच्या मदतीने जागेवर बसून कर भरता येणार आहे.

या शिवाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटी ने भरणा केल्यास सहा टक्क्यांची सवलत मिळणार आहे. डिजिटल पेमेंटशिवाय कर भरणाऱ्यांना मात्र पाच टक्केच सवलत मिळेल.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा