नागपूर, १९ ऑगस्ट २०२३ : कारागृहातील कैद्यांना आता लवकरच आपल्या कुटुंबियांशी फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळताच नागपूर मध्यवर्ती कारागृहसोबतच महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबियांशी बोलण्यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
यामध्ये प्रत्येक कैदयाला त्यांच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटापर्यंत बोलू दिले जाणार आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड देऊन, त्यांच्या नातेवाईक किंवा वकीलांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटे बोलण्याची मुभा दिली. त्याचा चांगला फायदाही दिसून आला. तसेच इतर सोयीसुविधाही कैद्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर