अण्णासाहेब जाधव यांना विशेष सेवा पुरस्कार

पुरंदर: भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी)अण्णासाहेब मारुती जाधव यांना, पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल २६ जानेवारी २०२० रोजी विशेष सेवापदक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.

अण्णासाहेब जाधव यांची गतवर्षी गडचिरोली येथून बदली झाल्यानंतर ( डी.वाय.एस.पी. ) पोलीस उपअधीक्षक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभागात बदली झाली.
महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये समाधानकारक सेवा, कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार पोलीस यंत्रणेकडून सन्मान केला जातो. याप्रमाणे सासवड येथील (डीवायएसपी) पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांनी गडचिरोली येथे पोलीस आणि जनता यांच्यामधील संबंध सुधारणे, सामाजिक उपक्रमात सहभाग, नक्षलविरोधी कारवाईत सहभाग यांसह अन्य सामाजिक ,सांस्कृतिक उपक्रमात जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. पोलीस प्रशासन व सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.या त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल नुकतेच विशेष सेवापदक पुरस्कार देण्यात आला.

अण्णासाहेब जाधव यांनी पुरंदर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक सलोखा व सर्वसामान्य नागरिकांना शांततापूर्ण व सुरक्षित वातावरण निर्माण करत गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यात यशस्वी झाले आहेत . तसेच ते अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मदतीचा हात देत आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा जिद्द, चिकाटी, कष्ट आणि आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार करणारे एक अभ्यासू, समाजशील, प्रेरणादायी, समाजशील, कर्तव्यदक्ष दबंग पोलीस अधिकारी म्हणून भोर विभागात त्यांची विशेष ओळख आहे.

“हा विशेष सेवा पदक पुरस्कार” पुणे येथील पोलीस अधीक्षक कार्यालय पाषाण या ठिकाणी २६ जानेवारी २०२० ला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिला गेला.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,पुण्याचे पोलिस आयुक्त, उपायुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच पोलिस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून व पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्याकडून अण्णासाहेब जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा