कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकार अपयशी : भाजप

नाशिक, दि.२०मे २०२०: कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढतच आहे. महाराष्ट्राने कोराेना रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. या संदर्भात कोरोना रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याबरोबरच विविध स्तरावर महाराष्ट्राला अधोगतीच्या मार्गावर ढकले गेले आहे. राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी विविध गोष्टीवर राजकारण करण्यात मग्न आहे. राज्य सरकारने जनतेच्या कोरोना संकट, जनतेच्या विविध प्रश्नांवर लक्ष घालून ते मार्गी लावावेत, असे निवेदन भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.

कोविड१९ तिया विरोधात केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स आखून दिल्या, त्याबाबत कामकाज करण्यात राज्य सरकार संपूर्णतः अपयशी ठरले आहे. पीपीई किट,  हॉस्पिटल निर्मिती अशा स्तरावर राज्य सरकारने जनतेची निराशा केल्याची भावना भाजपने दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली, केरळ या सर्वांनीच आपापल्या राज्यातील जनतेकरता काही हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. परंतू महाराष्ट्र सरकारने शून्य रुपयाचे पॅकेज जाहीर केले.

रेशनवरचे धान्य मोफत देणे तर सोडाच पण धान्य आठ रुपये आणि बारा रुपय किलो ने त्या ठिकाणी दिले आणि ते सुद्धा एप्रिलचे धान्य न देता मे महिन्यामध्ये हे धान्य द्यायला या सरकारने सुरुवात केली. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोटाळे चालू आहेत. यामुळेच गरिबांचे निम्न मध्यमवर्गीयांचे, हातावर पोट असलेल्या लोकांचे अतोनात हाल चालू असल्याचा आरोप भाजपने केले आहे.

यावेळी खा.भारती पवार, शहराध्यक्ष गिरीष पालवे, महापौर सतिष नाना कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आ.राहुल ढिकले, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.राहूल आहेर आदीं उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा