फिल्म इन्स्टीट्यूटच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

पुणे, ०५ ऑगस्ट २०२२: पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे‌. डेक्कन पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अश्र्विन अनुराग शुक्ला, वय ३२, राहणार गोवा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एफटीआयआय मधील मुलांच्या वसतिगृहातील एस १२ बी ब्लॉक रुममध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रुम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर तत्काळ डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेतल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाला पाचारण करुन तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा