पुणे विद्यापीठाच्या नवीन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरदूत

पुणे, १२ मार्च २०२३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा संकल्प करीत स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यात मॅन्युफॅक्चरिंग स्मार्ट फॅक्टरी, ॲनिमल हाऊस, अमृत सरोवर, सांस्कृतिक संग्रहालय, विद्यापीठ संगीत भवन आदींसह विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रमांसाठी खर्च केला जाणार आहे. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी अर्थसंकल्प सादर करताना नव्या योजनांची माहिती दिली.

विज्ञान आणि संशोधनाची माहिती होण्यासाठी आता दरवर्षी विद्यापीठातर्फे विधार्थ्यांना इंडियन सायन्स काँग्रेसला पाठविण्यात येईल. त्यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विभागाचा विस्तार केला जाणार आहे; तसेच विद्यापीठ संगीत भवन उभारले जाणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांचा आदान-प्रदान उपक्रम राबविण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय विधार्थ्यांना भारतीय भाषांचे प्रशिषण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात योग अभ्यासक्रम राबविला जातो. आता योग प्रशिक्षण आणि योग थेरपीही सुरू करण्यात येईल. विद्यापीठातर्फे तीन नवीन अभ्यास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यात भाषाशास्त्र आणि अनुवाद अभ्यास केंद्र, भारतीय ज्ञान व्यवस्था अभ्यास केंद्र आणि भरडधान्य अभ्यास केंद्र यांच्या समावेश करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा