पुणे १० फेब्रुवारी २०२५: शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधलेले भुयारी मार्ग आता नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. एकेकाळी नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेले हे मार्ग आज वापराविना पडून आहेत. शहरातील वाकडेवाडी, शिवाजीनगर, मॉडर्न कॉलेज, जे. एम. रोड आणि डेक्कन यांसारख्या भागांतील भुयारी मार्ग आता ओस पडले आहेत.
या मार्गांची दुर्दशा इतकी वाईट झाली आहे की, ते अंधार, घाण आणि असुरक्षिततेचे केंद्र बनले आहेत. नागरिकांनी या मार्गांचा वापर करणे पूर्णपणे बंद केले आहे. या मार्गांमध्ये सतत अंधार असतो, पाणी गळते आणि दुर्गंधी येते. त्यातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांना आपली सुरक्षा धोक्यात वाटते.


महिलांसाठी हे मार्ग अत्यंत असुरक्षित बनले आहेत. येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे महिला आणि मुलींना एकट्याने ये-जा करणे खूपच धोकादायक झाले आहे. अनेक वेळा महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांनी या मार्गांचा वापर बंद केला आहे.
या भुयारी मार्गांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपायय
न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे