शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यश

वाशिम, दि.२७ एप्रिल २०२०: वाशिम जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांना लॉकडावऊनमुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. गेल्या एक महिन्यापासून सातत्याने प्रशासनाला सहकार्य करत असतांना शेतकऱ्यांच्या अडचणीत मात्र भरच पडत होती.

यासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, विष्णुपंत भुतेकर यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडुन शेतीशी संबधीत विविध कामे नियम व अटीच्या आधीन राहुन चालु करण्यासाठी मंजुरी घेतली आहे.

लॉकडाऊन असतांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ सकाळीच दूध घालता येत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संध्याकाळी काढलेले दुध सकाळपर्य॓त खराब होत होते. भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संबधीत बाबतीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून संध्याकाळी परवानगी मिळवण्यात आली.

त्याच बरोबर गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या शेतातील नवीन विजेचे पोल उभे करणे व वीज जोडणी देणे महावितरणने बंद केले होते. तोंडावर आलेला पावसाळा आणि शेतकऱ्यांनी भरलेल्या वीज जोडणीची कोटेशनचा विचार करता सदर कामे सुरू होणे क्रमप्राप्त होते. याही प्रकरणात ’भुमिपुत्र’ने राज्याचे उर्जा मंत्री राऊत यांच्याशी बोलुन कामे सुरु करण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो पेड-पेंडीग शेतकऱ्यांचा कामाचा मार्ग मोकळा झाला.

सिंचनासाठी खोदलेल्या विहरी देखील अर्धवट होत्या. लॉकडाउनमुळे मजुर निघुन गेले तर परवाना धारक ब्लास्टिंग वाल्यांची कामे बंद करण्यात आली. त्यामुळे शासकीय, खाजगी विहरी, पाईपलाईन व विस्फोटकांचा वापर होणारी सर्व कामे बंद झाली होती. या परिस्थितीमधे पावसाळा जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असते. त्यातुन मार्ग काढण्यासाठी भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी पुढाकार घेऊन जिल्हाअधिकार्‍यांना विनंती करून परवाना धारक विस्फोटकांना काम करण्याची मुभा मिळवून दिली.

भुमिपुत्र शेतकरी संघटनेने केकेल्या या सर्व कामांमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा