सोलापूर २२ मार्च २०२४ : कुणबी दाखल्यामुळे माढा तालुक्यातील सुदर्शन धनाजी पाटील यांची, ओबीसी प्रवर्गातून पोलीस पाटील पदी सरळसेवेतून निवड झाली. या निवडीबद्दल सुदर्शन पाटील यांचा टेंभूर्णी येथे सन्मान करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेली दोन वर्षे झाले कुणबी दाखले मिळावेत व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. यामुळेच सुदर्शन धनाजी पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि या आरक्षणाचा लाभ पाटील यांना मिळाला. सुदर्शन धनाजी पाटील हे या आरक्षणाचा लाभ घेणारे माढा तालुक्यातील पहिले मानकरी ठरले आहेत.
या निवडी बद्दल सुदर्शन पाटील यांचा सन्मान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मधुकर देशमुख, मा.सरपंच सापटणे दत्तात्रय ढवळे पाटील, युवा नेते विनोद पाटील सर, अध्यक्ष छत्रपती ग्रुप नानासाहेब ढवळे पाटील, पोपट काका महाडिक देशमुख, सुरज बाळासाहेब ढवळे पाटील, प्रदीप पाटील सर, बिभीषण पाटील सर, भारतीय जनता पार्टी माढा तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष सागर काशिद, अतुल सरडे, सोनू गोसावी यांची यावेळी उपस्थिती होती. सोमनाथ काका कदम, बबन भोसले सर, नवनाथ खुळे, दादासाहेब पिसाळ सर या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रदिप पाटील