जालना शहरातील नॅशनल भागातील नागरिकांनी घेतली विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांची भेट

जालना २३ मार्च २०२४ : जालना शहरातील नॅशनल भागातील नागरिकांनी आज विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांची भेट घेतलीय. छत्रपती संभाजी नगर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र हे आज जालना दौऱ्यावर होते. नॅशनल नगर भागात लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून २० ते २५ जणांनी घरात घुसून महिलांना लाथा बुक्याने मारहाण केल्याची घटना १५ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु आठवडा झाला तरी आरोपींना अटक झाली नसून हे मोकाट आरोपी फिर्यादींना सतत धमकावत असल्याची माहिती फिर्यादींनी विशेष पोलिस महानिरीक्षकांना देऊन त्वरित कारवाईची मागणी केलीय.

१५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून पुरुषांसह महिलांना २०/२५ जणांच्या जमावाने लाठ्या काठ्या आणि हत्याराने मारहाण केली होती. यात शेख नाहेद शेख अकबर आणि झाहेद शेख जावेद रा.गल्ली नंबर दोन, नॕशनल नगर, जालना हे दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. टोळक्याने केलेल्या मारहाणीत महिला देखील जखमी झाल्या होत्या यात गर्भवती महिलेला देखील या टोळक्याने जाणार मारहाण केली होती. याप्रकरणी मारहाणीत जखमी झालेले शेख जाहीद शेख जावेद यांच्या फिर्यादीवरून १)रफिक जंहागिर २)आवेश जागीरदार, ३)सलमान जागिरदार, ४)सजिद जागिरदार, ५)अकबर जागिरदार, ६)वादेज जागिरदार या सहा जणांविरुद्ध कलम ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ अशा विविध कलमान्वये चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान आज नॅशनल नगर भागातील नागरिकांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिलय. सोबतच या २०/२५ जणांच्या टोळ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलीय. सदर टोळकं नागरिकांना गुन्हे मागे घेण्यासाठी दम दाटी करत धमक्या देत आहे. त्यामुळे यांचा बंदोबस्त करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी डॉ. चव्हाण यांच्या कडे केलीय. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक, वीरेन्द्र मिश्र, यांनी नॅशनल नगर भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना योग्य ते उपचार घेण्यास सांगितले आहे. शिवाय पोलिस प्रशासन याप्रकरणात योग्य तो तपास करेल आणि टोळक्याविरुद्ध कायदेशीर कारवाई अशी ग्वाही देखील त्यांनी दिलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा